अ‍ॅनिमेशन कोर्स बद्दल माहिती, कोर्सची पात्रता, कोर्स कसा करावा?

By oMarathi.com •  Updated: 09/19/20 •  1 min read

अ‍ॅनिमेशन म्हणजे काय?

तुम्ही Avengers किंवा Avtar हे चित्रपट पाहीलेत? हे दोन्ही चित्रपट VFX designing सारख्या वेगवेगळया अ‍ॅनिमेशनच्या मदतीने बनवले आहेत.

अ‍ॅनिमेशन म्हणजे काही खऱ्या गोष्टी आणि काही व्हिजुअल गोष्टी एकत्र करून नविन गोष्ट बनवने.

अ‍ॅनिमेशनचा वापर आपल्याला माहित असलेल्या खालिल गोष्टींमध्ये होतो:

 • चित्रपट (बाहुबली, अवतार, Avengers, इत्यादी.)
 • वृत्तपत्र (वृत्तपत्रामध्ये ग्राफिक्स् डिजाईन, 3 डी सारखे अ‍ॅनिमेशन वापरतात.)
 • कार्टुन शो (आपण लहानपणी जे कार्टुन पाहायचो ती सगळी अ‍ॅनिमेशनची कमाल आहे.)
 • फोटोशॉप केलेले फोटो (फोटोशॉप केलेले फोटो हा देखिल एक अ‍ॅनिमेशनचा प्रकार आहे.)

अ‍ॅनिमेशन करणे सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला काही सॉफ्टवेअरचा वापर योग्यरित्या करता आला पाहीजे आणि तुम्ही क्रीएटीव्ह असणे पण गरजेचे आहे. क्रीए​टीव्हीटीला आपण अ‍ॅनिमेशनचा आधारस्तंभ म्हटले तरी काही हरकत नाही.

किती प्रकारचे अ‍ॅनिमेशन कोर्सेस असतात?

अ‍ॅनिमेशन कोर्स करायचा असेल तर तुम्ही तो 4 प्रकारे करू शकता.

अ‍ॅनिमेशन कोर्स करण्याचे 4 प्रकार आहेत:

 1. डिप्लोमा कोर्स
  • डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन हा 1 वर्षाचा कोर्स असतो.
  • डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन कोर्ससाठी तुम्ही 10+2 झालेले पाहीजे.
 2. डिग्री कोर्स
  • अ‍ॅनिमेशनचा डिग्री कोर्स 3 किंवा 4 वर्षांचा असतो.
  • अ‍ॅनिमेशन डिग्री साठी तुमचे 10+2 झालेले पाहीजे.
  • काही कॉलेज/इन्स्टीटयुट 10+2 मध्ये तुमचे 50% पेक्षा जास्त गुण पाहीजेत अशी अट ठेवतात.
 3. पोस्ट ग्रॅज्युएशन
  • पोस्ट ग्रॅज्युएशन इन अ‍ॅनिमेशन हा 2 वर्षांचा कोर्स आहे.
  • अ‍ॅनिमेशन क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी तुमचे कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन झालेले पाहीजे.
 4. सर्टिफीकेट कोर्स      
  • अ‍ॅनिमेशन कोर्सेसचे भरपुर सर्टिफीकेट कोर्स आहेत.
  • त्यातले काही जास्त पसंत केलेले अ‍ॅनिमेशन सर्टिफीकेट कोर्सेस आहेत 3D अ‍ॅनिमेशन, ग्राफिक डिजाईनिंग आणि VFX.

अ‍ॅनिमेशन कोर्ससाठी मी पात्र आहे का?

जर तुम्हाला अ‍ॅनिमेशन क्षेत्रात डिग्री किंवा डिप्लोमा करायचा असेल तर तुमचे 10+2 पुर्ण असणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा की काही कॉलेज/इंस्टीटयुट तुमचे 10+2 ला 50% गुण कमीत कमी पाहीजे अशी अट ठेवु शकता पण हे फक्त काही कॅालेज/इंस्टीटयुट करतात.

जर तुम्हाला अ‍ॅनिमेशन क्षेत्रातले सर्टिफीकेट कोर्स (Certificate in 3D animation, Graphics Design, VFX) घ्यायचा असेल तर तुम्ही दहावी झाल्यावर हे सर्टि​फीकेट कोर्स करू शकता.

अ‍ॅनिमेशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स पण आहेत. त्यासाठी तुमची कोण्तीही एक डिग्री पुर्ण असणे आवश्यक आहे.

अ‍ॅनिमेशन कोर्समध्ये मला काय शिकवतात?

अ‍ॅनिमेशन कोर्समध्ये तुम्हाला अ‍ॅनिमेशनसाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते शिकवतात.

तुम्हाला डिजाईन करणे, आयडियाला व्हीसुलाईज करणे, रंगांचा वापर कसा करायचा, ग्राफिक डिजाईन,फोटो ​एडिटींग सारख्या गोष्टी शिकवल्या जातात.

काही अ‍ॅनिमेशनसाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहेत:

 • अडोब फोटोशॉप (Adobe Photoshop)
 • अडोब अफ्टर इफेक्टस् (Adobe After Effects)
 • ऑटोडेस्क माया (Autodesk Maya)
 • ऑटोडेस्क मोशनबिल्डर (Autodesk MotionBuilder)
 • ऑटोडेस्क मुडबॉक्स (Autodesk MudBox)
 • अडोब क्रीएटिव्ह सुट (Adobe Creative Suite)

अ‍ॅनिमेशन कोर्स पुर्ण झाल्यावर तुम्हाला अ‍ॅनिमेशन सॉफ्टवेअर वापरून अ‍ॅनिमेशन क्षेत्रात नोकरी किंवा वेगवेगळे धंदे करून पैसे कमाऊ शकता.

अ‍ॅनिमेशन कोर्स करतांना मला कॉम्पुटर विकत घेणे गरजेचे आहे का?

हो, अ‍ॅनिमेशन कोर्सचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे संगणक असणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला संगणक कसे चालवावे हे माहीत नसेल तर तुम्ही आधी ते शिकुन घेणे गरजेचे आहे.

Read: Computer information in Marathi

अ‍ॅनिमेशन कोर्समध्ये तुम्हाला अ‍ॅनिमेशनचे सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते शिकवतात.

काही सॉफ्टवेअर असे असु शकतात की ते त्या संगणकावर जास्त भार टाकु शकता. त्यामुळे कॉम्पुटर गरम होणे, फ्रीज होणे, हॅंग होणे असे प्रकार घडतात.

हे टाळण्यासाठी तुम्हाला आधी या गोष्टीची माहीती काढावी लागेल की अ‍ॅनिमेशन करण्यासाठी कोणते कॉम्पुटर वापरावे लागतात.

खुप प्रकारचे कॉम्पुटर असतात, जास्त प्रोसेसिंग पॉवर असणारे कॉम्पुटर अ‍ॅनिमेशन करण्यासाठी उपयोगी पडते.

जर तुम्हाला चांगल्या पध्दतीने अ‍ॅनिमेशन शिकायचे असेल तर तुम्ही तुमचे स्वताचे कॉम्पुटर नक्की घ्या.

हे लक्षात ठेवा की जिथे तुम्ही अ‍ॅनिमेशन शिकत आहात, तिथे शक्यतो त्यांचे स्वताचे कॉम्पुटर असतात ज्यावर तुम्हाला प्रॅक्टीस करू दिली जाते. पण घरी प्रॅक्टीस करण्यासाठी तुम्हाला तुमचे स्वताचे Computer लागेल.

जर तुम्ही अ‍ॅनिमेशनचा कोर्स Udemy किंवा coursera सारख्या प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन करणार असाल तर तुम्हाला तुमचे स्वत:चे कॉम्पुटर घेण्याशिवाय काही पर्याय नाही.

अ‍ॅनिमेशन कोर्स कुठे करता येतो?

अ‍ॅनिमेशन कोर्स 3 प्रकारे करता येतो. ते 3 प्रकार आहेत:

 • कॉलेजमधुन अ‍ॅनिमेशन कोर्स करणे.
 • प्रायव्हेट इंस्टीटयुट /क्लास मधुन अ‍ॅनिमेशन कोर्स करणे.
 • ऑनलाइन प्लॅटफॉर्म व्दारे ऑनलाइन अ‍ॅनिमेशन कोर्स करणे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरून तुम्ही घरबसल्या कोर्स करू शकतात.

अ‍ॅनिमेशन कोर्स केल्यावर मला नोकरी भेटेल का?

अ‍ॅनिमेशन क्षेत्राला खुप जास्त डीमांड येत आहे आणि त्यामुळे खुप जास्त विद्यार्थी या क्षेत्रामध्ये आपले करीयर बनवत आहे.

तुमचा कोर्स पुर्ण झाला की तुम्हाला शक्यतो नोकरी शोधावी लागेल. सुरूवातीला तुम्हाला 15 हजार ते 20 हजार पर्यंत पगार असु शकतो.एक्स्पीरीएंस असलेल्या व्यक्तीला 50 हजारांच्या घरात पगार असु शकतो.

जर तुम्ही ऑनलाइन कोर्स करत आहात तर तुम्हाला स्वत:च जावुन नोकरी शोधण्याशिवाय काही पर्याय नाही.

तर तुम्ही प्रायव्हेट इंस्टीटयुटस् किंवा कॅालेजमधुन कोर्स करणार असाल तर तुम्हाला कॉलेज / इंस्टीटयुट प्लेस करून देते. शक्यतो अट अशी असते की 80% पेक्षा जास्त अटेडंन्स असली तर जो पर्यंत तुम्हाला नोकरी भेटत नाही तो पर्यंत ते तुम्हाला नोकरी देण्यासाठी प्रयत्न करत राहतील.(यालाच 100% प्लेसमेंट असिस्टंन्स म्हणतात.)

पण असे काही नाही की अ‍ॅनिमेशन शिकल्यावर तुम्ही नोकरीच केली पाहीजे. ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी खुप मार्ग उपलब्ध आहेत. 

तुम्ही Fiverr किंवा Upwork सारख्या फ्रीलान्सींग प्लॅटफॉर्म वर फ्रीलान्सींग करून खुप पैसे कमावु शकता. कींवा तुम्ही तुमच्या युटयुब चॅनेल चालु करून त्यावर टीपस् देवु शकता. (अशा प्रकारे कलाइंटस् स्वताहुन तुम्हाला कामासाठी कॉन्टॅकट करतील.)

याचे एक उदाहरण दयायचे म्हटलं तर VFX Guy Aman नावाचा YouTube चॅनेल. हो हा तोच युटयुब चॅनेल आहे ज्यांनी इंडीयन ​हॅरी पॉटर सेरीज बनवली आणि खुप छान प्रकारे अॅनिमेशन केल्यामुळे ही सेरीज खुप पसंत केली गेली.

तुम्ही तुमचा ब्लॉग चालु करू शकता आणि ब्लॉग व्दारे पैसे कमाउ शकता किंवा ब्लॉग व्दारे क्लाइंटला सर्व्हीस देवु शकता. 

तुम्ही स्वताची ही अ‍ॅनिमेशन ऐजन्सी टाकुन पण पैसे कमाउ शकता.

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.