डेटा एन्ट्री म्हणजे काय? जाणून घ्या डेटा एन्ट्री द्वारे पैसे कमवण्याचे मार्ग!

By oMarathi.com •  Updated: 04/23/21 •  1 min read

कामं ऑनलाईन, शाळा ऑनलाईन आणि तितकच न्हवे तर दुकाने देखील ऑनलाईन झाली आहेत आणि असे असतांना अनेक नवीन जॉब संधी देखील निर्मित झाल्या आहे, त्या पैकीच एक प्रकार आहे डेटा एन्ट्री, आज जाणून घेऊया डेटा एन्ट्री बद्दल संपूर्ण माहिती. 

ऑनलाईन जगाचा वाढता प्रसार बघता, माहिती सुद्धा कागदावरून संगणकात हलवण्याची गरज भासू लागली आणि जन्म झाला डेटा एन्ट्री जॉब्स चा! ह्या जॉब्स साठी लागणारी शैक्षणीक पात्रता आणि अन्य कौशल्य जाणून घेण्याआधी बघूया डेटा एन्ट्री म्हणजे काय?

डेटा एन्ट्री म्हणजे काय? | Data Entry Meaning in Marathi

डेटा एन्ट्री चा अर्थ कोणत्या हि इनपुट डिवाइस जसे कि कीबोर्ड, स्कॅनर, बारकोड रीडर इत्यादी चा वापर करून माहिती ला कंप्यूटर मध्ये फीड करणे असा होतो.आज आपण जाणून घेणार आहोत, डेटा एन्ट्री बद्दल ची मूलभूत माहिती आणि ह्या कौशल्या द्वारे  पैसे कमवण्याचे मार्ग सुद्धा. 

डेटा एन्ट्री ऑपरेटर (DAO) म्हणजे काय? | Data Entry Operator Marathi Meaning

डेटा एन्ट्री करणारी व्यक्ती, डेटा एन्ट्री ऑपरेटर (DAO) म्हणून ओळखली जाते. एक डेटा एन्ट्री ऑपरेटर ची जबाबदारी, माहिती ला अनेक वेग वेगळ्या स्वरूपात संगणकात फीड करणे असते, ह्या प्रक्रियेत टायपिंग आणि काही विशिष्ट कामांसाठी, ट्रान्सलेशन चा देखील वापर करण्यात येतो.

डेटा एन्ट्री ऑपरेटर पात्रता, प्रशिक्षण | Data Entry Training in Marathi

आता वळूया, डेटा एन्ट्री ऑपरेटर (DAO) च्या पात्रते कडे.

डेटा एन्ट्री ऑपरेटर (DAO) च्या शैक्षणिक पात्रते बद्दल जागतिक पातळीवर कुठलेच ठोस अशे नियम नाही आहेत! पण, सहसा इंटरमीडिएट म्हणजे एचएससी किमान पात्रता मानल्या जाते, काही विशिष्ट कामांसोबत किमान पात्रता स्नातक असल्याचे देखील जोडल्या जाते!

शैक्षणिक पात्रते व्यतिरिक, संगणकाचे ज्ञान देखील गरजेचे असते कारण एक डेटा एन्ट्री ऑपरेटर (DAO) आपल्या कामाच्या व्याप्तीत संगणकाचा भरपूर वापर करतो, जसे टायपिंग, ट्रान्सलेशन टूल्स चा वापर करणे, इमेल्स करणे आणि इतर इनपुट डिवाइस चा पण वापर करण्याची गरज भासू  शकते. 

 डेटा एन्ट्री ऑपरेटर (DAO) च्या कामाचे स्वरूप बघता, विविध भाषांवर देखील पकड असणे आवश्यक असते कारण जी माहिती हाताळायची आहे ती मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये देखील प्रस्तुत केल्या जाऊ शकते. त्याचवेळी सहसा वापरल्या जाणारे सॉफ्टवेयर जसे एमएस वर्ड आणि एमएस एक्सेल चे मूलभूत ज्ञान असणे पण आवश्यक ठरते. हे सॉफ्टवेयर शिकणे फार कठीण नाहीच आणि त्यासाठी कुठल्याच कोर्सेस मध्ये भाग घेणे देखील गरजेची नाही.

डेटा एन्ट्री जॉब | Data Entry Jobs Meaning in Marathi | Marathi Data Entry Jobs from Home

 डेटा एन्ट्री ऑपरेटर (DAO) च्या पात्रते बद्दल माहिती जाणून घेतल्या नंतर आता वळूया या संबंधित जॉब्स बद्दल! अनेक कंपनी डेटा एन्ट्री ऑपरेटर (DAO) च्या पदा साठी जाहिराती अनेक नोकरी शोध प्लॅटफ्रोम्स वर प्रकाशित करत असतात, त्या पदांसाठी अर्ज करणे डेटा एन्ट्री च्या वापराने पैसे कमवायचे सर्वात सोपा मार्ग आहे. 

असे असले तरीही या पदांसाठी अर्ज करत असतांना आपल्या संपूर्ण लक्ष देऊनच करायला हवे कारण ह्या ऑनलाईन जगात जसे कामं करणे आणि मिळवणे सोपे झाले आहे तसेच फसवा फसवी चे प्रमाण देखील वाढल्याचे नेहमीच दिसून येते! या काही गोष्टींचे लक्ष ठेवणे गरजेचं आहे जसे कि,

फसवाफसवी चे प्रमाण असले तरीही ह्या क्षेत्रात चांगल्या व विश्वसनीय संधी देखील बऱ्याच आहेत, तर वाट कसली बघताय, आजच तयारी ला लागा आणि स्वतः ला तयार करा ह्या क्षेत्रात असणाऱ्या अनेक सोनेरी संधीचा आस्वाद घेण्यासाठी! 

डेटा एन्ट्री, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि त्या कार्यक्षेत्रात असणारे जॉब्स बद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे कळवायला विसरू नका! 

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.