दैनंदिन जीवनात आपण सर्वेच व्हाट्सअँप चा बराच वापर करतो! मित्रपरिवाराला पोट गुदगुदवणारे विनोद आणि व्हिडिओ शेयर करण्या पासून तर सध्याच्या वर्क फ्रॉम होम च्या जगात कामाचा मागोवा ठेवण्या पर्यंत सगळ्या कामांसाठी व्हाटसअँप नेहमीच फार मदतीचे ठरले आहे.

पण आज आपण जाणून घेऊया व्हाट्सअँप म्हणजे नक्की काय आणि त्या द्वारे खरंच पैसे कमावणे शक्य आहे कि नाही, हे देखील बघूया! 

व्हाट्सअँप म्हणजे नक्की काय?

व्हाट्सअँप एक इंटरनेट च्या मदतीने काम करणारे इन्स्टंट मेसेजिंग टूल आहे, अर्थ असा कि इंटरनेट आणि व्हाट्सअँप च्या मदतीने दोन व्यक्तींना त्वरित रित्या आपसात संवाद साधण्याची संधी मिळते. ह्या माध्यमाद्वारे टेक्स्ट, इमेजेस आणि व्हिडिओ, म्हणजेच मल्टिमिडीया चा वापर संवादात करणे शक्य होते! व्हाट्सअँप च्या वापरकर्त्यांना जोडणारे माध्यम इंटरनेट असल्यामुळे, भौगोलिक मर्यादांचे अडथळे येतच नाही आणि त्यामुळे ह्या माध्यमाच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली आहे.

व्हाट्सअँप द्वारे खरंच पैसे कमावणे शक्य आहे कि नाही?

व्यापक वापर असणाऱ्या व्हाट्सअँप चा वापर, दोन सोप्या पद्धतींनी पैसे कमावण्यासाठी वापर करणे शक्य आहे! 

एफिलिएट मार्केटिंग 

आणि 

लिंक शॉर्टनिंग 

एफिलिएट मार्केटिंग चा अर्थ वेगवेगळ्या ब्रॅण्ड च्या प्रॉडक्ट्स चे प्रोमोशन करून विक्री घडवून आणणे असा होतो, ह्या पद्धतीने प्रत्येक विक्री वर मिळणाऱ्या कमिशन च्या आधारे पैसे कमवणे शक्य होते. 

पण एफिलिएट मार्केटिंग करायची कशी? 

वेगळ्या ब्रॅण्ड्स एफिलिएट मार्केटिंग साठी विशिष्ट लिंक्स प्रदान करतात, त्या लिंक्स तुम्ही व्हाट्सअँप द्वारे आपल्या मित्रपरिवारा सोबत शेयर करू शकता, अश्या विशिष्ट लिंक्स, तुमच्या अकाउंट किंवा नावाला जोडल्या असतात, आणि प्रत्येक विक्री सोबत ठराविक कमिशन आपल्या अकाउंट मध्ये जमा होत जातो! बहुसंख्य ई-कॉमर्स वेबसाईट नि हि सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

वळूया दुसऱ्या मार्गाकडे म्हणजेच लिंक शॉर्टनिंग कडे. लिंक शॉर्टनिंग मध्ये देखील लिंक शेयर करून पैसे कमावता येण्याची मुभा आहे. 

कशी करतात लिंक शॉर्टनिंग?

अनेक वेबसाईट जसे कि bit.ly, वेगवेगळ्या लिंक्स ला लहान करून शेयर करण्याची संधी देतात, ह्या लिंक्स वर जितक्या वेळा क्लिक केल्या जाते, तितक्या वेळा वापरकर्त्यांना काही जाहिराती दाखवल्या जातात आणि त्या लिंक्स तयार करणाऱ्या व्यक्ती च्या अकाउंट मध्ये काही ठराविक रक्कम जमा होते. 

ह्या पद्धती द्वारे पैसे कमावण्यासाठी, तुम्हाला लिंक शॉर्टनिंग वेबसाइट्स सोबत नोंदणी करणे गरजेचे आहे, नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच, तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया, विडिओ आणि प्रॉडक्ट लिंक्स देखील शॉर्ट करून आपल्या मित्रपरिवारा मध्ये शेअर करू शकणार!

हि शॉर्ट केलेली लिंक दिसायला लहान आणि वापरायला सोपी असते आणि महत्वाची  गोष्ट म्हणजे वापरकर्त्यांच्या अनुभवात अडथळा आणत नाही, फक्त मुख्य मजकूरा पर्यंत पोहोचण्या आधी एक अतिरिक्त पाऊल जोडले जाते! ती अतिरिक्त पायरी वापरकर्त्यांना काही जाहिराती दाखवते आणि मग त्यांना मुख्य मजूकरा कडे  घेऊन जाते आणि ह्या पद्धतीने, व्हाट्सअँप आणि लिंक शॉर्टनिंग च्या मदतीने पैसे कमवल्या जाऊ शकतात.

ह्या दोन्ही पद्धतीने पैसे कमावणे शक्य आहे पण काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, एकदा त्याबाबत च्या माहिती कडे लक्ष देऊया.

जसे एफिलिएट मार्केटिंग मार्केटिंग करतांना विश्वसनीय ब्रॅण्ड्स सोबत काम करण्यास प्राधान्य द्यावे, असे केल्याने फसवाफसवी शक्यता कमी होते. प्रॉडक्ट लिंक्स सोबत प्रॉडक्ट चे समालोकन सोबत जोडल्यास प्रॉडक्ट सेल आणि तुम्हाला मिळणारे कमिशन, दोन्ही वर सकारात्मक प्रभाव दिसून येईल. 

तसेच लिंक शॉर्टनिंग चा पण वापर करत असतांना विश्वसनीय लिंक शॉर्टनिंग टूल्स चा वापर करावा म्हणजे वापरकर्त्यांना आणि तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही. 

तर मित्रानो हे होते व्हाट्सअँप  द्वारे पैसे कमावण्याचे दोन प्रभावी आणि सोपे मार्ग! जर तुम्हाला हे मार्ग आवडले असतील आणि तुम्ही ते वापरून बघणार असाल तर आपला अनुभव आम्हाला सांगायला विसरू नका!