ऑटोकॅड (AutoCAD) काय आहे? ऑटोकॅडचा कोर्से कसा करावा? मराठीत ऑटोकॅड कोर्सची माहिती

By oMarathi.com •  Updated: 08/09/20 •  1 min read

तुम्हाला ऑटोकॅडचा कोर्से करायचाय? ऑटोकॅड काय आहे हे जाणून घायचंय? मी ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला ऑटोकॅड बद्दल सर्व माहिती देणार आहे.

तर आपण आधी हे जाणून घेऊया कि ऑटोकॅड नेमका काय आहे ते.

ऑटोकॅड (AutoCAD) काय आहे?

ऑटोकॅड हे एक सॉफ्टवेअर आहे. संगणकाच्या मदतीशिवाय ऑटोकॅडचा वापर आपण करू शकत नाही.

ऑटोकॅड एक drafting सॉफ्टवेअर आहे. Drafting सॉफ्टवेअर म्हणजे ऑटोकॅड मसुदा बनवण्यासाठी वापरले जाते.

ऑटोकॅड सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण कोणत्याही गोष्टीचा virtual मॉडेल 2D किंवा 3D मध्ये तयार करू शकतो.

ऑटोकॅड सॉफ्टवेअर कोण व कश्यासाठी वापरतात?

तुम्हाला माहीतच असेल कि कोणतीही मोठी बिल्डिंग किंवा पुलाचे बांधकाम करण्याआधी त्याची ब्लूएप्रिन्ट बनवतात. हि ब्लूएप्रिन्ट

बनवण्यासाठी ऑटोकॅड सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. ऑटोकॅड सॉफ्टवेअरचा logo बनवण्यासाठी, इंटिरियर design चे प्लॅन्स बनवण्यासाठी व अजून भरपूर गोष्टींसाठी वापर केला जातो.

ऑटोकॅड कोर्स म्हणजे नेमक काय?

ऑटोकॅड कोर्से मध्ये तुम्हाला ऑटोकॅड हे सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते शिकवले जाते. हा कोर्से एक सर्टिफिकेट कोर्से आहे.

हा कोर्से पूर्ण झाल्यावर आपण ऑटोकॅड सॉफ्टवेअर व्यवस्थितपणे वापरू शकता.

या कोर्समुळे तुम्हाला नोकरी मिळू शकते.

ऑटोकॅड कोर्सचा कालावधी किती आहे?

ऑटोकॅड कोर्से हा MSCIT कोर्से सारखा सर्टिफिकेट कोर्से आहे. ऑटोकॅड कोर्सेची कालावधी २ ते ३ महिने असते. जर आपण ऑटोकॅड कोर्से ऑनलाइन करत असाल तर आपण हा कोर्से १ महिने किंवा ४ महिन्यात पूर्ण करू शकता, ते आपण दिवसाला किती वेळ कोर्सेसाठी देतात त्यावर अवलंबून आहे.

ऑटोकॅड कोर्से कुठे करावा?

आपण ऑटोकॅड कोर्से ऑनलाइन किंवा ऑफलाईन करू शकता. ऑनलाइन पद्धतीने कोर्से करणे सोपे जाते कारण आपण आपल्या सोयीनुसार तो पूर्ण करू शकता.

टीप – ऑनलाइन कोर्से पूर्ण करण्यासाठी Udemy ह्या प्लॅटफॉर्मवर खूप कोर्सेस उपलब्ध आहेत.

ऑटोकॅड कोर्से करण्यासाठी किती खर्च येतो?

ऑटोकॅड कोर्से जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने केला तर तुम्हाला ५ हजार ते ७ हजार रुपये शुल्क आकारले जाऊ शकते.

जर तुम्ही ऑनलाइन कोर्से करणार आहेत तर Udemy ह्या प्लॅटफॉर्मवर ४९९ किंवा ७४९ रुपयात पूर्ण करू शकतात.

ऑफलाईन आणि ऑनलाइन दोन्ही कोर्से केल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कोर्से ऑनलाइन करायचा का ऑफलाईन हे ठरवू शकता.

ऑनलाइन कोर्सेसाठी तुमच्याकडे संगणक आणि इंटरनेट असणे आवश्यक आहे.

Also read: Nursing Course Information in Marathi

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.