BBA Course Information in Marathi

By oMarathi.com •  Updated: 08/09/20 •  1 min read

BBA म्हणजे Bachelor of Business Administration. BBA एक खूप जास्त पसंती असलेला graduation  कोर्से आहे.

BBA कोर्सेसाठी मी पात्र आहे का?

BBA कोर्से मध्ये तिन्ही streams (science, arts, commerce) आणि डिप्लोमा मधली मुले ऍडमिशन घेऊ शकतात.
वाणिज्य पार्श्वभूमी असणे अनिवार्य नाही.

आपल्याकडे 12 वी मध्ये किमान 45% गुण असावेत. आपण बारावीत इंग्लिश हा विषय घेणे आवश्यक आहे.

प्रत्येक मुलाला BBA साठी ऍडमिशन घ्यायला त्याच्या कॉलेजद्वारे घेतलेली कॉमन एंट्रन्स टेस्ट (CET) देणे अनिवार्य आहे.

BBA कोर्सेची ऍडमिशन प्रोसेस कशी असते?

BBA कोर्सेसाठी शक्यतो बारावीच्या मार्क्सच्या आधारे ऍडमिशन घेतले जाते. पण अशे काही कॉलेजेस आहेत जे BBA च्या ऍडमिशनसाठी एंट्रन्स टेस्ट घेतात. एंट्रन्स टेस्ट नन्तर interview  देखील घेतात. ऍडमिशन process तुम्ही कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेत आहेत त्यावर अवलंबून असते.

BBA कोर्से पूर्ण करण्यासाठी किती फी लागते?

BBA कोर्सेला किती फी लागणार ते तुम्ही कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेत आहेत त्यावर अवलंबून आहे.  BBA कोर्सेची वार्षिक फी ₹४०,००० ते ₹१,५०,००० पर्यंत असू शकते.

BBA कोर्से मध्ये मी नक्की काय शिकणार?

BBA कोर्से मध्ये तुम्हाला Management Education बद्दल basics शिकवले जातील. तुम्हाला communication skills मध्ये ट्रेन केले जाईल आणि तुमच्यातले उद्योजकीय कौशल्ये विकसित केले जातील.

शिकवण्याचे माध्यम इंग्रजी असेल.

BBA चे कॉलेज placement drives घेतात का?

हो, शक्यतो सगळेच BBA कॉलेजेस placement drives घेतात. आपण off-campus placement ड्राईव्हसाठी पण जाऊ शकता.

BBA कोर्से पूर्ण करण्यासाठी किती वर्ष लागतात?

BBA कोर्से हा ३ वर्षाचा graduation  कोर्से आहे. BBA कोर्से हा एक सेमिस्टर पॅटर्न कोर्से आहे. एका वर्षात २ सेमिस्टर असतात. BBA पूर्ण करण्यासाठी ६ सेमिस्टर्स पास करावे लागतात.

BBA कोर्से केल्यांनतर पुढे काही scope  आहे का?

BBA पूर्ण झाल्यावर जास्तीत जास्त मुले MBA करणे पसंत करतात. BBA नन्तर तुम्हाला जोब पण भेटू शकतो. जर तुम्ही BBA नन्तर जॉब करणार असाल तर तुम्ही वार्षिक ३ लाखाच्या आसपास पगाराची अपेक्षा ठेऊ शकता. पण शक्यतो असे म्हंटले जाते कि BBA नन्तर MBA करणे योग्य असते.

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.