आपण सर्वेच रोज बराच वेळ यूट्यूब वर विडिओ बघतो, बरेच काही शिकतो आणि मनोरंजनाचा आस्वाद देखील घेतो, पण तुम्हाला माहिती आहे का यूट्यूब द्वारे पैसे देखील कामवाल्या जाऊ शकतात!
यूट्यूब, हे एक जागतिक व्याप्ती चे व्यासपीठ आहे जे वापरकर्त्यांसाठी देखील खुले आहे. म्हणजेच, ह्या व्यापिठावर विडिओ रुपी सामग्री कोणीही सादर करू शकते. यूट्यूब वर मनोरंजक किंवा माहितीपूर्ण विडिओ तयार करून दर्शकत्व विकसित करणे शक्य आहे.आवर्ती प्रेक्षकगण येताच, यूट्यूब द्वारे पैसे कमावण्याचे मार्ग खुले होत जातात!
जसे,
आता बघूया ह्या मार्गांकडे जरा जास्त लक्ष देऊन. (how to earn money from YouTube in Marathi)
गूगल एड्स
यूट्यूब वर पैसे कमावण्याची पहिली आणि सर्वात सोपी पायरी म्हणजेच यूट्यूब पार्टनर कार्यक्रमात सहभागी होणे. यूट्यूब पार्टनर कार्यक्रमात गूगल अॅडसेन्सद्वारे विडिओ निर्मात्यांच्या च्या व्हिडिओ आधी, मधात किंवा शेवटी देखील जाहिराती दाखवल्या जातात, ह्या जाहिरातींद्वारे यूट्यूब ला होणाऱ्या मिळकतीचा काही भाग यूट्यूब, यूट्यूब पार्टनर कार्यक्रमात नोंदणी केलेल्या विडिओ निर्मात्यांसोबत देखील सामायिक करते.
ब्रँड स्पॉन्सरशिप
आता वळूया ब्रँड स्पॉन्सरशिप कडे.
आपण बरेच वेळा विडिओ निर्मात्यांना आपल्या विडिओ मध्ये काही प्रॉडक्ट किंवा सर्विसेस ची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या जाहिरात करतांना बघतो, त्याला “ब्रँड चा एकत्रीकरण” किंवा “ब्रँड स्पॉन्सरशिप” असे म्हणतात.
जाहिरातीचा एक आकर्षक प्रकार म्हणजे ब्रँड स्पॉन्सरशिप, जे डिजिटल मार्केटींग च्या जगात “इन्फ्लुएन्सर मार्केटिंग” म्हणून देखील ओळखले जाते. एक कंपनी एखाद्या व्हिडिओमध्ये ब्रांड किंवा उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी व्हिडिओ निर्मात्यास पैसे देण्याचे करार करते आणि ह्या पध्दतीने आवर्ती प्रेक्षकगण असणाऱ्या विडिओ निर्मात्यांना पैसे कमावण्याचा आणखी एक मार्ग मोकळा होतो!
सौंदर्य प्रसाधने, मोबाईल फोन्स, वस्त्रांच्या ब्रॅण्ड्स आणि एफएमसीजी उत्पादने जसे थंड आणि गरम पेय आपल्या विक्री वर सकारात्मक ब्रँड स्पॉन्सरशिप च्या परिणामासाठी काही देयक देऊ करतात.

तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि मार्गदर्शन असल्यास, तुम्ही देखील ऑनलाइन पैसे कमवू शकता!
यूट्यूब मेम्बरशिप्स
यूट्यूब द्वारे कमाई करण्याचा आणखी एक लोकप्रिय मार्ग म्हणजे विडिओ निर्मात्याच्या चॅनेल ची सदस्यता होय. काही चाहते, निर्मात्यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी किंवा बोनस सामग्री जसे कि बॅजेस, इमोजी, स्पेशल व्हिडिओ, लाइव्ह चॅट्स इत्यादी साठी एक ठराविक मासिक देयक देतात. ह्या पद्धतीला “मेम्बरशिप प्लान” असे म्हटले जाते.
यूट्यूब वर मेम्बरशिप ची सुविधा प्राप्त होण्यासाठी विडिओ निर्मात्यांना कमीतकमी 30,000 सब्स्क्रिबर्स असणे आवश्यक असते, तसे नसतांना देखील काही तृतीय-पक्ष सेवा देखील व्हिडिओ निर्मात्यांना त्यांच्या चाहत्यांच्या आधारावर मासिक सदस्यते द्वारे कमाई करण्याची संधी देतात. पेट्रिऑन, टॅग मँगो हे अश्याच काही तृतीय-पक्ष सेवा प्रदत्तांपैकी आहेत.
मर्चन्डाईस ची विक्री.
आणि आजचा शेवटचा मार्ग, मर्चन्डाईस ची विक्री.
ह्या मार्गाद्वारे, युट्युब विडिओ निर्मात्यांना त्यांच्या दर्शकांना त्यांचे मर्चन्डाईस जसे कि, टी-शर्ट्स, दागिने, बॅग्स इत्यादी विकणायची मुभा मिळते, ह्या पद्धतीने देखील यूट्यूब च्या मदतीने पैसे कमावणे शक्य होते. पण ह्या मार्गासोबत बरीच गुंतागुंत होते, जसे कि मर्चन्डाईस चे उत्पादन, पॅकेजिंग ग्राहक-दर्शकांपर्यंत पोहचवणे इत्यादी, पण हि गुंतागुत सोडवण्याचे उपाय असतांना ह्या मार्गाद्वारे चांगला नफ़ा मिळवणे शक्य होते.
तर हे होते युट्युब च्या मदतीने पैसे कमवणायचे मार्ग.
एकदा थोडक्यात उजळणी करून घेऊया.
- गूगल एड्स: विडिओ आधी, दरम्यान किंवा शेवटी येणाऱ्या जाहिरातींद्वारे होणारी मिळकत.
- ब्रँड स्पॉन्सरशिप: विडिओ दरम्यान निर्मात्यांद्वारे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ची केलेली जाहिरात, किंवा शिफारस.
- यूट्यूब मेम्बरशिप्स: चाहत्यांद्वारे निर्मात्यांनाआपला पाठिंबा दर्शवण्यासाठी किंवा बोनस सामग्री साठी ठराविक मासिक देयक देतात, आणि ह्या मार्गाने युट्युब द्वारे मासिक मिळकत देखील शक्य होते.
- मर्चन्डाईस ची विक्री: ह्या मार्गाद्वारे, युट्युब, विडिओ निर्मात्यांना त्यांच्या दर्शकांना त्यांचे मर्चन्डाईस जसे कि, टी-शर्ट्स, दागिने, बॅग्स इत्यादी विकणायची सेवा उपलब्ध करून देते.
हे होते युट्युब द्वारे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग पण लक्षात असू द्या, हे शक्य फक्त तेव्हाच होते जेव्हा तुमच्याकडे आवर्ती प्रेक्षकगण असेल!
oMarathi.com
आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.
तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि मार्गदर्शन असल्यास, तुम्ही देखील ऑनलाइन पैसे कमवू शकता!