How to Start a Blog in Marathi

By oMarathi.com •  Updated: 10/17/20 •  2 min read

ब्लॉगिंग मध्ये वापरले जाणारे काही बेसिक गोष्टी आज आपण समजून घेऊया!

ब्लॉगिंग सुरू करायचीयं? इंटरनेट वर त्याबद्दल माहीती वाचतायेत पण तुम्हाला कळत नाही की नेमकं लेखकाला काय सांगायचंय? ब्लॉगिंग मधले काही शब्द कळत नाही?

मी तुम्हाला हया आर्टीकल मध्ये ते सर्व शब्द आणि त्यांचे अर्थ सांगणार आहे.

तुम्हाला माहीतच असेल की ब्लॉगिंग सुरू करतांना काही स्टेपस् फॉलोव कराव्या लागतात.

मी तुम्हाला नीट समजावे म्हणुन कोणत्या स्टेप मध्ये तुम्हाला कोणते शब्द कानावर पडतील आणि कदाचित कळणार नाही त्यांचा संग्रह करून समजावुन सांगितलेला आहे.

म्हणजे तुम्ही वेबसाईट टाकली आणि SEO करायला सुरूवात केली आहे, तर SEO मधले वापरले जाणारे शब्द मी SEO पॉइंट खाली एक लिस्ट तयार करून समजावुन सांगितले आहेत.

मी तुम्हाला हे सर्व एकदम सोप्या भाषेत समजावुन सांगेल पण तरी जर तुम्हाला काही शब्द कळत नसतील तर मला कॉमेंटस् मध्ये कळवा, मी ते तुम्हाला समजावुन सांगेल.

वेबसाईटचा niche ठरवतांना वापरले जाणारे शब्द

जेव्हा तुम्ही वेबसाईट चालु करायच ठरवता तेव्हा कोणत्या विषयावर वेबसाईट बनवायची तो निर्णय आधी घेता, बरोबर? तर त्यात वापरले जाणारे दोन शब्द आहेत niche आणि micro niche.

Niche म्हणजे काय?

Niche म्हणजे तुम्ही ठरवलेला एक विषय ज्यावर तुम्ही ब्लॉग करणार आहात.

असं समजा की तुम्हाला टेक्नॉलॉजी वर ब्लॉग बनवायचाय, तर टेक्नॉलॉजी हा तुमचा niche झाला.

अशाच प्रकारे खुप सारे Niche असतात ज्यावर लोक वेबसाईट बनवतात.

काही प्रसिद्ध niche आहेत –

  • एंटरटेनमेंट
  • शिक्षण
  • How to
  • फिटनेस आणि weight लॉस
  • रिलेशनशिप

Micro niche म्हणजे काय?

Micro niche हा niche चा एक छोटा भाग असतो.

खुप वेळा लोक काही कारणांसाठी मोठया niche मधल्या एका छोटया भागावर वेबसाईट बनवतात.

त्या छोटया भागाला micro niche म्हणतात.

तुम्हाला उदाहरण दयायचे म्हणजे “headphones at low price” हा एक micro niche आहे “technology” हया niche चा. आता तुम्हाला  niche आणि micro niche मधला फरक कळला असेल.

वेबसाईट बनवतांना वापरली जाणारी शब्द

जेव्हा तुमचा niche किंवा micro niche ठरतो, त्यानंतर वेबसाईटचा सेटअप करायचा असतो.

जेव्हा तुम्ही वेबसाईट कशी बनवायची यावर ऑनलाइन व्हिडीवो पाहात असणार तेव्हा हे शब्द तुम्ही खुप वेळा ऐकले असणार. चला तर मग, आपण एक एक करून पाहु हया शब्दांची अर्थ.

Domain name म्हणजे काय?

Domain name म्हणजे तुमच्या वेबसाईटचा व्हर्च्युअल पत्ता. हया वेबसाईटचा domain name omarathi.com आहे.

तुम्हाला domain name विकत घ्यावा लागतो.

Domain name म्हणजे ऑनलाइन जगात तुमचा वेबसाईटचा पत्ता असा म्हटलं तरी चालेल.

Hosting म्हणजे काय?

Hosting ही एक प्रकारची सर्व्हीस आहे ज्याला आपण domain connect करतो वेबसाईट बनवतांना. Hosting नसली तर वेबसाईट चालत नाही. Hosting दुसऱ्या लोकांना आपल्या वेबसाईट चा access देते. Blogger सारख्या प्लॅटफॉर्मवर गुगल hosting फ्री देतं पण WordPress वापरण्यासाठी आपल्या Hostgator, Bluehost सारख्या कंपण्यांकडुन hosting विकत घ्यावी लागते.

Theme म्हणजे काय?

Theme म्हणजे तुमच्या वेबसाईटसाठी वापरली जाणारी त्वचा आहे ज्यामुळे तुमची वेबसाईट चांगली दिसते.

आपण असं म्हणु शकतो की theme तुमच्या वेबसाईटचे कपडे आहेत.

जितकी चांगली theme असती, तितकी चांगली तुमची वेबसाईट दिसेल.

बऱ्याच themes फ्रिे असतात पण चांगली theme पाहीजे असेल तर ती विकत घ्यावी लागते.

Plugin म्हणजे काय?

Plugin म्हणजे तुमच्या वेबसाईट वर वापरला जाणारी एक जोड गोष्ट आहे. जर तुम्ही वर्डप्रेस वापरत असाल तर हे गरजेचे नाही की तुम्हाला कोडींग आली पाहीजे. कोडींग न करता तुमच्या वर्डप्रेस वेबसाईटवर तुम्हाला काही फंक्शनॅलिटी टाकता याव्यात यासाठी बनवतात प्लगइन.

उदाहरण : तुम्हाला तुमच्या पोस्ट मध्ये “Table of contents” टाकायच्या आहे, तर तुम्ही प्रत्येक पोस्टचे कोड करत बसणार का? आणि ज्यांना कोड करता येत नाही ते काय करणार? हे काम सोपे करण्यासाठी खुप प्लगइन आहेत की जे इंस्टॉल केलेत की जे “table of contents” आपोआप तुमच्या पोस्ट वर येतात. 

कीवर्ड रिसर्च करतांना वापरली जाणारी शब्द :

वेबसाईट बनवल्यावर आता तुम्हाला किवर्ड रिसर्च करावा लागल ज्याच्या मदतीने तुम्ही कोणते आर्टीकल लिहायचे हे ठरवु शकता. या साठी वेगवेगळे आॅनलाइ्बन टुल्स आहेत जे आपल्याला किवर्ड रिसर्च साठी मदत करतात.

काही प्रसिध्द किवर्ड रिसर्च टुल आहेत:

Google Trends

Ahrefs

Moz

UberSuggest

SERP – SERP म्हणजे सर्च् इंजिन रॅंकींग पॉसिशन. जर तुम्ही पोस्ट एखादया किवर्ड वर 3 नंबरला रॅंक करत असेल तर त्या पोस्टची SERP 3 आहे. 

Long Tail keyword – Long tail keyword म्हणजे लांब किवर्डस्.  “shoes” हा एक ब्रॉड किवर्ड आहे आणि “how to buy shoes for 20 years old?” हा लॉंग टेल किवर्ड आहे.

Keyword difficulty – keyword difficulty म्हणजे त्या किवर्ड साठी रॅंक करणं किती अवघड आहे.हे तुम्हाला वरचा टुलस् मधुन सहज कळते. जितका कमी किवर्ड डीफीकल्टीचा स्कोर असतो, तितका जास्त त्या किवर्डसाठी रॅंक करणे सोपे असते. 

Keyword Search Volume – keyword search volume म्हणजे एका महिण्याला कीती लोक हा किवर्ड् सर्च करतात. याची माहीती पण तुम्हाला वरती दिलेल्या टुल्स मधुन सहज कळते.

वेबसाइटसाठी आर्टीकलस् लिहीतांना वापरली जाणारी शब्द:

ओरीजनल कंटेन्ट

ओरीजनल कींवा युनिक कंटेन्ट म्हणजे तुम्ही स्वत:च कोणाला कॉपी न करता लिहीलेलं कंटेन्ट. असे खुप लोक असतात की जे दुस—या वेबसाइट वरचा कंटेन्ट कॉपी करून त्यांच्या वेबसाइटवर टाकतात. पण असा चालत नाही, गुगलचा अल्गोरिदम असे आढळल्यास तुम्हाला पॅनल्टी देता. पॅनल्टी म्हणजे तुमची वेबसाइट गुगल वरून  काढुन टाकली जाते.

Duplicate/Palgarised Content

Duplicate content म्हणजे कुठुन तरी कॉपी केलेला कंटेन्ट.

वेबसाइट SEO फ्रेंन्डली करतांना वापरली जाणरे शब्द:

वेबसाइट SEO करतांना खुप काही गोष्टी कराव्या लागतात. पण नविन माणुस असेल तर या खुप सा—या गोष्टी काय आहे तेच कळत नाही. तर आपण आधी SEO मध्ये वापरले जाणारे शब्द पाहुया. जर तुम्हाला SEO बद्दल डिटेल माहीती मराठी मध्ये पाहीजे असेल तर आमच्या SEO गाईड हया पेजला भेट दया.

SEO

On-page SEO – तुम्ही रॅंकींग साठी तुमच्या वेबसाइट वर जे काही बदल करतात त्याला म्हणतात on-page seo. याचा अर्थ असा की तुम्ही आर्टीकल मध्ये किवर्डस् टाकलेत., किंवा मेनु बनवला नॅव्हीगेशन साठी, हे सगळे on-page seo ची उदाहरणे आहेत ज्यासाठी तुम्हाला तुमच्या वेबसाइट मध्ये बदल करायचे असतात.

Off-page SEO – off page SEO म्हणजे रॅंकींगसाठी तुम्ही तुमच्या वेबसााइट बाहेर जे प्रयत्न करतात त्याला म्हणतात Off-page SEO. यात सगळयात जास्त वापरलेला  off-page seo method म्हणजे दुस—या वेबसाइटस् कडुन आपल्या वेबसाइटसाठी बॅकलिंक्स घेणे.

White Hat SEO – white hat seo म्हणजे कोणतीही अलॉव न केलेली गोष्ट न करता  SEO करणे.

Black Hat SEO – black hat seo म्हणजे अलॉव नसणा—या गोष्टी करून वेबसाइटचा  SEO करणे.हे डोक्याचे काम असते कारण याने खुप वेबसाइटस् ला पॅनल्टी भेटते.  Black hat seo चे एक उदाहरण आहे पैसे देवुन लिंकस् विकत घेणे.

Grey Hat SEO – grey hat  म्हणजे दोन्ही white hat seo आणि black hat seo एकाच वेबसाइटवर करणे.

Tags

Tags वेब crawlers ला तुमच्या वेबसाइट वर काय करायचे याचे दिलेले इन्ट्रक्शनस् असातात.

Index tag– index हा टॅग असला तर crawler ला asi इंन्ट्रक्शन दिली जाते की ही पोस्ट गुगल सर्च मध्ये दिसली पाहीजे .

No-index tag – no index tag म्हणजे तुम्ही crawler ला सांगत आहात की तुमची तुमच्या पोस्ट किंवा वेबसाइटला गुगल सर्च मध्ये रॅंक करण्याची इच्छा नाही.

Links

जसं की मी वर सागिंतलं, लिंकस् बनवणे हे SEO चे एक खुप महत्वाचे काम मानले जाते. तर त्या लिंक्स मध्ये 2 प्रकार आहेत. 

Internal Link – internal link म्हणजे तुम्ही तुमच्या वेबसाइट वरून तुमच्या वेबसाइटला लिंक करत आहात. उदाहरण : एका पोस्ट वरून दुस—या पोस्ट ला लिंक करणे म्हणजे internal linking.

External Link – जेव्हा दुसरी वेबसाइट तुमच्या वेबसाइट ला लिंक करत आहे त्याला म्हणतात external link.

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.