मित्रांनो! आपल्या भारत देशामध्ये भारत सरकारकडून विविध योजना लागू केल्या जातात. भारत सरकारने ग्रामीण रोजगारांचे विविध कार्यक्रम राबवले आहेत त्यामध्ये जवाहर रोजगार योजना, एकात्मिक ग्रामीण विकास योजना संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना इत्यादी. या योजना व्यतीरिक्त मित्रांनो तुम्ही कधी मनरेगा या योजनेबद्दल ऐकले आहे का? तुम्हाला जरी मनरेगा म्हणजे काय? किंवा मनरेगा ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती नसेल तर निराश होण्याची काहीही गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही mgnrega full form in Marathi आणि मनरेगा म्हणजे काय? घेऊन आलोत.

Mgnrega full form in Marathi | मनरेगा म्हणजे काय?

Mgnrega चा इंग्रजी अर्थ ” Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act” असा होतो तर, mgnrega full form in Marathi ” महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम” असा होतो.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम एक भारतीय कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे त्याचे मुख्य उद्दिष्टे ‘ कामाच्या अधिकाराची हामी देणे’ असे आहे.

सप्टेंबर 2005 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला सुरूवातीला या कायद्याचे नाव नरेगा असे होते परंतु पुढे येणाऱ्या मध्ये अनेक सुधारणा करण्यात आला व त्याचे नाव बदलून mgnrega असे करण्यात आले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना गारंटी अधिनियम याचा मुख्य उद्देश देशातील गरीबांना रोजगार हक्काची हमी देणे आहे.

तसेच संपूर्ण देशातील ग्रामीण कुटुंबांना वित्तीय वर्षात शंभर दिवस प्रति कुटुंब कुशल रोजगार प्राप्त करून देणे हादेखील या योजनेचा उद्देश आहे.

तर मित्रांनो! “Mgnrega full form in Marathi | मनरेगा म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्राला आवाज शेअर करा.

धन्यवाद!