Rera full form in Marathi | रेरा म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो! तुम्ही वर्तमानपत्र आणि टीव्हीमध्ये रेरा कायदा बद्दल नक्कीच ऐकले असेल. परंतु तुम्हाला रेरा कायदा म्हणजे काय? आणि rera ला मराठी मध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही म्हणजे काय? आणि rera full form in Marathi घेऊन आलोत.

Rera full form in Marathi | रेरा म्हणजे काय?

Rera चा इंग्रजी अर्थ “Real Estate Regulatory Act” असा होतो तर, Rera full form in Marathi ” स्थावर मालमत्ता नियमक कायदा” असा होतो.

रेरा हे रियल इस्टेट एक 2016 चा एक कायदा आहे. या कायद्याला भारतीय संसद मान्यताप्राप्त आहे. Rera चा मुख्य उद्देश रियल इस्टेट मध्ये ग्राहकांचे गुंतवणूक वाढवणे आणि त्यांच्या हितांचे रक्षण करणे हा आहे. 10 मार्च 2016 ला राज्यसभा मध्ये रेरा कायदा ला मान्यता मिळाली. आणि एक मे 2016 पासून हा कायदा संपूर्ण राज्यामध्ये लागू झाला.

बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी रेरा हा बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी रेरा कायदा करण्यात आला वर एक मे पासून या कायद्याची महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आली.

रेरा या कायद्यामुळे रियल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणि शिस्त निर्माण झाली. रेरा कायदा ची अंमलबजावणी करणारे भारत देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले.

Rera ची आवशक्यता –

रेरा आणि सरकार मॉडेल कोड चा मुख्य उद्देश मुख्य बाजार मधील विक्रेता आणि संपत्ती चेक खरिदार त्यांच्यामध्ये योग्य न्याय संबंध आणि योग्य गुंतवणूक ठरवणे हा आहे. रेरा या कायद्यामुळे रियल इस्टेट या क्षेत्रामध्ये अधिक पारदर्शकता आणि शिस्त निर्माण झाली.

या कायद्यामुळे प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या गृहनिर्माण प्रकल्पाची गृहनिर्माण प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक झाले. या नोंदीमुळे खोट्या आश्वासने देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली. तसेच प्राधिकरणाकडून परवानगी मिळाल्याशिवाय कोणालाही त्याच्या प्रकल्पाची जाहिरात करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना ते खरेदी करीत असलेल्या घराबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकते.

या सर्व कारणांमुळे रेरा चे आवशक्यता वाढतच चालली आहे.

तर मित्रांनो! “Rera full form in Marathi | रेरा म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.