Share Market Information in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .
आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती । Share market basic Information in Marathi “ घेवून आलोत.
आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती । Share Market Information in Marathi
मित्रांनो ! आपणास शेअर मार्केट म्हणजे काय माहिती आहे का? आपल्यातील बहुतांशी लोकांना शेअर मार्केट म्हणजे काय हे माहिती नाही तरीसुद्धा आपण इंटरनेटवर किंवाव आपल्या आसपासच्या परिसरामध्ये, काम करतो त्या ऑफिस मध्ये कंपनीमध्ये, किंवा शाळा महाविद्यालय कुठल्याही ठिकाणी अनेकांच्या तोंडातून शेअर मार्केट हे नाव ऐकलेच असेल.
आणि आजकाल इंटरनेट वर बर्याच पोस्ट पण शेअर मार्केट संबंधित पाहतो. आपल्यामधील बहुतांशी जणाला शेअर मार्केट या क्षेत्रावर अतिशय आकर्षण असेल. परंतु योग्य माहिती नसल्याने बहुतेक जण या क्षेत्राकडे वळले जात नाही. इंटरनेटवर महाराज पोस्टद्वारे शेअर मार्केट ची माहिती दिली जाते परंतु ती माहिती थोडक्यात असल्याने शेअर मार्केट संबंधित अपूर्ण ज्ञात असल्याने बहुतेक जण त्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत. तेव्हा जे कोणी करतात त्यांचा तोटा होतो.
ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची आहे आणि योग्य ज्ञान नाही त्यांच्यासाठी आजची आमची पोस्ट खूप फायदेशीर ठरेल. कारण आजच आर्टिकल मध्ये आम्ही शेअर मार्केट म्हणजे काय? पासून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी ? व आपला फायदा कसा करून घ्यावा या पर्यंत सर्व माहिती घेऊन आलेलो आहोत.
मला आशा आहे आर्टिकल वाचून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.
शेअर मार्केट हा कोणत्याही देशाचा अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख भाग असतो. शेअर मार्केट चा फायदा हा कंपन्यांना तसेच या कंपन्यांद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला सुद्धा होतो. काही लोकांच्या मते शेअर मार्केट हा पैसे कमावण्याचा एक योगसाधना आहे तर काही लोकांच्या मते शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे. परंतु शेअर मार्केट चा वापर योग्य पद्धतीने केला तर शेअर मार्केट नक्कीच एक पैसे कमवण्याचे साधन होऊ शकतो.
भारतातील चार टक्के लोक हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. शेअर मार्केट मधील महान गुंतवणूकदार म्हणजे वॉरध बफे यांनी वयाच्या 13 व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार ला बरच नावाने ओळखले जाते. ” SHARE “ हा इंग्रजी भाषेतील एक शब्द आहे. शेअर या शब्दाचा साधा आणि सोपा अर्थ म्हणजे ” भाग.”
स्टॉक मार्केट आणि शेअर बाजार हे याच ” भाग “ म्हणजे शेअर तत्त्वावर कार्यरत असते .
BSE ( Bombay Stock Research ) हा भारतातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज मानला जातो. BSE ची स्थापना अठराशे 75 मध्ये भारताची पहिली स्टॉक एक्सचेंज म्हणून झाली.
यानंतर येणारा भारताचा दुसरा सर्वात मोठा स्टोक म्हणजे NSE ( National Stock Exchange of India ) हा आहे.याची स्थापना 1992 मध्ये झाली.
शेअर मार्केट म्हणजे काय What is the Share Market ( Stock market ) in Marathi ?
जसे की आपणास माहिती आहे शेअर मार्केटला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते कोण याला स्टॉक मार्केट सुद्धा म्हणतात. अर्ध थेट भाग असा होतो. बाजारातील विविध कंपन्यांद्वारे शेअर मार्केट चा बिजनेस केला जातो.
उदाहरणात, समजा एखाद्या कंपनीने एक लाख शेअर्स जारी केले आहे. जर एखादा व्यक्ती त्या कंपनी मधील काही शेअर्स विकत घेत असेल तर तो त्या शेअरचा मालक बनतो.
समजा, एखाद्या कंपनीतील 1,00000 शेअर्स पैकी 40000 शेअर्स एखाद्या व्यक्तीने खरेदी केल्यास त्या कंपनीत त्याचा 40 टक्के एवढा हिस्सा असतो. आणि 40 टक्के वाटा त्या मालकाचा सुद्धा असेल.
स्टॉक कोणत्याही कंपनीतील व्यक्तीचा हिस्सा दाखवतात. आणी जेव्हा जेव्हा पाहिजे असेल, तेव्हा तो आपले शेअर्स चित्रांना विकू शकतो. आणि दुसरी कुठलीही व्यक्ती ते सहज खरेदी करू शकते.
कंपन्यांच्या सर्व शेअरच्या किंवा स्टॉपच्या नोंदी BASE मध्ये केल्या जातात. कंपनीच्या नाफा नुसार सर्व कंपन्यांच्या शेअरचे मूल्य कमी होत असेल किंवा वाढत असते.
संपूर्ण शेअर मार्केट व नियंत्रण ठेवण्याचे काम भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) करत असते.
जेव्हा SEBI एखाद्या कंपनीला परवानगी देते तेव्हाच ती कंपनी आपली initial public offering जाहीर करू शकते. कोणतीही कंपनी SEBI च्या परवानगीशिवाय IPO देऊ शकत नाही.
मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे नक्की काय कळाले च् असेल.
Share Market मध्ये कंपनी दिसते :
शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट यामध्ये कंपन्यांना येण्यासाठी बरेच करार करावे लागतात. तसेच कंपन्यांना एक्सचेंज(Exchange)कडून सुद्धा करार करावे लागतात. या कराराअंतर्गत कंपनींना वेळोवेळी आपल्या सर्व क्रियांची माहिती बाजारांना द्यावी लागते. या माहितीमध्ये गुंतवणूकदारांच्या हीतावर परिणाम करणाऱ्या माहिती सुद्धा समाविष्ट असतात.
कंपनींचे मूल्यांकन हे कंपनीने दिलेल्या माहितीच्या आधारे केले जाते. कंपनीने दिलेली ही माहिती अचूक असली पाहिजे. कंपनीने दिलेला मूल्यांकन च्या माहितीच्या आधारावर मागणी कमी किंवा जास्त झाल्यास त्या कंपनीच्या शेअरच्या किमती वर चढ-उतार होतो.
जर कुठली कंपनी लिस्टिंग कराराचा नियमांचे पालन करत नाही पाणी या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळून आल्यास SEBI त्या कंपनींना एक्सचेंज मधून काढून टाकण्यासाठी कारवाई केली जाते.
याव्यतिरिक्त कंपन्याना स्टॉक मार्केट मध्ये दिसण्यासाठी बऱ्याच स्तरांना पार करावे लागते. जसे की मागील तीन वर्षाचे कंपनीचे संपूर्ण रेकॉर्ड, कंपनीचा दोन कोटींपेक्षा जास्त बाजारामध्ये वाटा असायला हवं,IPO साठी अर्जदार कंपनीची भांडवलही दहा करोड आणि FPO साठी तीन करोड इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. याशिवाय एखादी कंपनी listing केल्यावर बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली जाते. आणि कडक नियम सुद्धा पाळावे लागतात.
कंपनी आपले शेअर्सचा विकते :
रिलायन्स ते एप्पल पर्यंतच्या सर्व कंपन्यांची लहाना टप्प्यात होते. परंतु काही काळ गेल्यानंतर टप्प्याटप्प्याने या कंपन्या वाढत जाऊन त्यांनी आपला विस्तार आज इतक्या मोठ्या प्रमाणात केला आहे.
तसेच कंपनीचा विस्तार करत असताना पैसा जमावण्या साठी कंपनीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आशा अडचणीत एक सोपा मार्ग म्हणजे कंपन्या बरेचदा अनेक बँकांकडून कर्ज घेतात. पण बँका नेहमीच कंपन्यांना कर्ज देतात असे नाही काही वेळा कर्ज देतात तर काही वेळा कर्ज देण्यास नाकार करतात. परंतु बँकांनी कंपन्यांना दिलेले हे कर्ज त्यांना व्याज सोबतच परत करावे लागते.
अशावेळी कंपन्या आपल्या शेअर्स विकून पैसे कमावतात. म्हणजेच कंपनीतील छोटासा हिस्सा विकून व्यवसाय विस्तारासाठी कंपनी गुंतवणूकदारांकडून पैसा उभा करते. याचा फायदा असा होतो की शेअर्स विकून जमा झालेले पैसे परत करण्याची किंवा या पैसे यावर व्याज देण्याची गरज नसते.
शेअर्सचे किती प्रकार आहेत:
शेअर चे वेगवेगळे प्रकार घडू शकतात. काही जण आपापल्या मतानुसार ची व्याख्या सुद्धा करतात. परंतु आज मी आजच्या आर्टिकल मध्ये शेअर चे मुख्य तीन प्रकार घेऊन आलं. या प्रकारचे शेअर्स तुम्हाला कळेल या भाषांमध्ये सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे.
1. Common Shares:
कॉमन शेअर्स या प्रकारातील शेअर्स कोणीही खरेदी करू शकतात आणि आवश्यक असल्यास विक्री सुद्धा करू शकतात. हे सर्वात सामान्य प्रकारचे शेअर्स असतात.
2. Bonus Shares :
बोनस शेअर्स म्हणजे जेव्हा एखादी कंपनी चांगला नफा कमवते आणि त्या कंपनीला त्यातील काही हिस्सा आपल्या भागीदारांना द्यायचा असतो. अशावेळी यामध्ये ती कंपनी Share एवजी पैसे देत नाही,जर share दिले तर त्याला Bonus Share म्हणतात.
3. Preferred Shares :
ही शेअर्स कंपनीकडून काही विशिष्ट लोकांसाठीच आणली जाते. जेव्हा एखादा कंपनी ला पैशाची खूप आवश्यकता असते आणि मार्केटमधून काही पैसे उभे करायचे असतात तेव्हा ते जे शेअर्स करतात. ते त्या विशिष्ट लोकांनाच खरेदी करण्याचा प्रथम अधिकार देतात.
Stock कसा खरेदी करावा How to buy stock In Marathi :
स्टॉक खरेदी करताना प्रथमता स्टॉक आपण सुद्धा निवडावा का एखाद्या ब्रोकरच्या मदतीने निवडावा हे ठरवणे महत्वाचे आहे.
स्टॉक खरेदी करण्यासाठी जर आपण ब्रोकर ची मदत घेत असेल तर प्रथम आपल्याला खाते उघडावे लागेल, ज्याला Demat Account असे म्हणतात. हे अकाउंट आपण आपल्या ब्रोकर द्वारे उघडू शकतो.
स्टॉक स्वतः खरेदी करण्यापेक्षा ब्रोकर द्वारे खरेदी केल्यास आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. एक म्हणजे आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळेल आणि दुसरे म्हणजे शेअर मार्केट संबंधित संपूर्ण माहिती मिळेल.
परंतु ब्रोकर मदत करण्यासाठी काही फी आकारतात केव्हा स्टॉप मधील काही नफा मागतात.
भारतामध्ये फक्त दोन स्टॉक एक्सचेंज आहेत एक म्हणजे NSE आणि दुसरा म्हणजे
BSE केवळ यामध्ये ज्या कंपन्यांनी आपली नावे लिस्टिंग केली आहेत त्याच कंपन्यातील स्टॉक खरेदी किंवा विक्री केल्या जातात.
जेव्हा जेव्हा आपण स्टॉक खरेदी करतो किंवा विकतो त्याचे संपूर्ण पैसे आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतात.
आणि हे डिमॅट अकाउंट आपल्या बँकेशी संलग्न असते, आपण आपल्या Demat Account तून आपल्या बँक खात्यावर पैसे सहजरीत्या पाठवू शकतो.
आपणास शेअर मार्केट वर पैसे गुंतवणूक करायचे असेल तर आपण Discount Broker ” Zerodha” वर आपले खाते तयार करू शकता. आणि त्यामध्ये शेअरही करू शकता.
Demat Account कसे उघडावे How to open a Demat Account In Marathi :
डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.
- पॅन कार्ड
- आधार कार्ड( आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा.)
- बँक पासबुक
- फोटो
कोणत्या ब्रोकरकडे डिमॅट अकाउंट उघडावे Which broker should I open a demat account with?
बाजारामध्ये आणि ब्रोकर आहे त्यांच्याकडून आपण डीमॅट अकाऊंट उघडू शकतो. पुढील काही ब्रोकरच्या आधार आहे आपण ऑनलाईन शेअरची खरेदी विक्री करू शकतो.
1. GROWW
2. ZERODHA
3. UPSTOX
4. ANGEL BROKING
कोणत्याही ब्रोकरेज फॉर्मद्वारे गुंतवणूक करण्याआधी त्या ब्रोंकरंज फॉर्म बाबत सर्व माहिती तपासून पहावी.
शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग ( Trading ) म्हणजे काय What is Trading in the Stock Market? :
स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग ( Trading ) हा शब्द खूप लोकप्रिय आहे.अनेक वेळा ट्रेडिंग हा शब्द ऐकला असेलच. ट्रेडिंग या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये व्यवसाय असा होतो.
जेव्हा जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा सेवा काही काळासाठी आपल्याकडे ठेवतो, जेव्हा त्या वस्तूला किंवा सेवेला चांगला भाव येतो तेव्हा आपण ती वस्तू किंवा सेवा विकून नफा मिळतो या उद्देशाने आपण एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करतो तेव्हा त्याला ” ट्रेडिंग ( Trading )”असे म्हणतात.
त्याच प्रकारे जेव्हा एखादी व्यक्ती शेअर मार्केटमध्ये एखादा स्ट्रोक खरेदी करते तेव्हा त्या व्यक्तीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ते स्टॉकच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ते स्टॉक विकून नफा नफा कमावणे, हा नफा कमावण्यासाठी स्टॉक विक्री आणि खरेदीच्या संपूर्ण प्रक्रियेला ” ट्रेंडिंग ( Trading )”असे म्हणतात.
ट्रेडिंग चे प्रकार Types of training in Marathi :
ट्रेडिंग चे बरेचसे प्रकार आहेत परंतु स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग चे मुख्य तीन प्रकार लोक वापरण्यास पसंत करतात ते पुढील प्रमाणे-
1. इंट्रा डे ट्रेडिंग मराठी Intra-day Trading :
एका दिवसात पूर्ण झालेल्या ट्रेडिंगला intra-dya Trading असे म्हणतात. इंट्रा-डे ट्रेडिंग मध्ये त्याच दिवशी स्टॉक विकत घेऊन त्याची विक्री केली जाते.
2. Scalper Trading :
खरेदी केल्याच्या काही मिनीटांतच विकल्या गेलेल्या Trades ना Scalper Trading असे म्हणतात.
यामध्ये शेअर्स पाच ते दहा मिनिटांत खरेदी करून ताबडतोब विकण्यात येतात. या प्रकारच्या स्ट्रोक चा जास्त नफा होतो.
3. Swing Trading :
या ट्रेडिंग ची संपूर्ण प्रक्रिया हे काही दिवसात,काही आठवड्यात तर महिन्यात पूर्ण केली जाते. स्टॉक खरेदी केल्यानंतर, गुंतवणूकदार आठवड्यात किंवा महिन्या सारख्या काळासाठी ते आपल्या जवळ ठेवतात. यानंतर स्टॉकची किंमत वाढवण्याची प्रतीक्षा करतात व स्टॉपला योग्य किंमत मिळाल्यास ते स्टॉक विकून टाकतात.
शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट डायलॉग धोकादायक खेळ म्हणतात परंतु याचा वापर योग्य रीतीने केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकते. शेअर मार्केटची पुर्णता माहिती असल्यास या क्षेत्रात उतरणे फायदेशीर ठरेल अथवा यामुळे खूप नुकसान सुद्धा होऊ शकते.
परंतु याचा अर्थ असा नाही की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये. एखाद्या व्यक्तीला शेअर मार्केट ची संपूर्ण माहिती असेल आणि गुंतवणूक कशी करावी याबद्दल ज्ञान असेल व संयम असेल तर तो व्यक्ती नक्की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो.
तर मित्रांनो ! ” Share Market Information in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.
” Share Market Information in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही points राहिले असेल तर ,कमेंट करून नक्की कळवा .
oMarathi.com
आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि मार्गदर्शन असल्यास, तुम्ही देखील ऑनलाइन पैसे कमवू शकता!