डीटीपी कोर्स म्हणजे नेमकं काय? डीटीपीचा फुल फॉर्म काय आहे?
डीटीपी चा फुल फॉर्म आहे “डेस्कटॉप पव्लिशिंग’’.
हा कोर्स खुप लोकं करतात. पण काय आहे डीटीपी कोर्स?
डीटीपी हा एक असा कोर्स आहे जो तुम्हाला designing, फॉरमॅटींग, एडीटींग, इ. गोष्टी शिकवतो.
डीटीपी कोर्स मध्ये तुम्हाला पेजमेकर, कोरलड्रॉ, Adobe फोटोशॉप सारखे सॉफ्टवेअर कसे वापरायचे हे शिकवले जाते.
तुम्ही जेव्हा हा कोर्स पुर्ण करता तेव्हा तुम्हाला हया सॉफ्टवेअरचा प्रॉफेशनली वापर करता येतो.
तसा पाहीले तर आपल्या दैनंदिन जिवनात आपल्याला खुप अशे उदाहरणे पाहायला भेटतात जिथे डीटीपी ऑपरेटरचा वापर करण्यात येतो.
तुम्ही तुमचे वाढदिवसाचे बॅनर लावतात ना? तो बॅनर कसा बनवतात ते ही डीटीपी कोर्स मध्ये तुम्ही शिकु शकता.
तुम्ही कधी विचार केला आहे की पेपर मध्ये खुप बातम्या असतात, पण त्या एकदम बरोबर मांडलेल्या असतात, ते केलेले असते डीटीपी ऑपरेटरने.

तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि मार्गदर्शन असल्यास, तुम्ही देखील ऑनलाइन पैसे कमवू शकता!
डीटीपी कोर्स कोण करु शकते?
डीटीपी कोर्स साठी जास्त काही बंधने नाहीत.
कोणीही डीटीपी कोर्स करु शकतो. अगदी 8 वी पास व्यक्ती सुध्दा डीटीपी कोर्स करू शकतो.
पण काही क्लासेस असतात जे काही मर्यादा ठेवतात की 10 वी झालेली पाहीजे, किंवा 12 वी झालेली पाहीजे.
ते तुम्ही डीटीपी कोर्स कुठे करतात त्यावर अवलंबुन आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा एज्युकेशनल बॅकग्राउंड जितका चांगला असेल तेवढे जास्त जॉब करण्याच्या तुम्हाला संधी भेटतात.
कारण मोठ मोठया कंपनीज् जेव्हा प्लेसमेंट ड्राईव्ह घेतात तेव्हा त्यांनी काही अटी ठेवलेल्या असतात. जसे की दहावी झालेली पाहीजे, दहावीत 60% पेक्षा जास्त गुण पाहीजेत. इ.
त्यामुळे चांगले शिक्षण असले तर बरे.
जर तुमचे जास्त शिक्षण झालेले नसेल तर घाबरू नका.
तुम्ही नोकरी करणा-या पेक्षा जास्त कमावु शकता तुमचा स्वताचा धंदा टाकुन.
आजकाल ऑनलाइन पैसे कमावणे खुप सोप्पे झालेले आहे.
तुम्ही फ्रीलान्सर बनुन ऑनलाइन पैसे कमावु शकता.
तिथे तुम्हाला कोणी तुमचे शिक्षण विचारत नाही, फक्त तुमचे काम कीती चांगले आहे ते पाहतात.
डीटीपी कोर्ससाठी मला कॉम्पुटर चालवता येणे अनिवार्य आहे का?
हो.
जर तुम्हाला डीटीपी कोर्स करायचाय तर तुम्हाला कॉम्पुटर चालवताच आले पाहीजे.
कमीत कमी तुम्हाला कॉम्पुटरचे बेसिक्स् तरी माहीत पाहीजे.
डीटीपी हा कोर्स तुम्हाला वेगवेगळे कॉम्पुटर सॉफ्टवेअरस् कसे वापरायचे ते शिकवतो.
जर तुम्हाला कॉम्पुटर वापरता येत नसेल तर तुम्ही सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते कसे शिकणार?
म्हणुनच, आपण संगणक ऑपरेट करण्यास सक्षम असणे खूप महत्वाचे आहे.
आपण संगणक योग्यरित्या ऑपरेट करू शकत नसल्यास प्रथम आपण एमएस-सीआयटी कोर्स पुर्ण केला पाहीजे.
एमएस-सीआयटी कोर्स मध्ये तुम्हाला कॉम्पुटर कसे वापरायचे ते शिकवले जाईल. त्या नंतर तुम्ही डीटीपी कोर्स करू शकता.
oMarathi.com
आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.
तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि मार्गदर्शन असल्यास, तुम्ही देखील ऑनलाइन पैसे कमवू शकता!