MSCIT course information in Marathi
- एम एस सी आय टी म्हणजे काय? एम एस सी आय टी चा फुल फॉर्म काय आहे?
- एम एस सी आय टी कोर्से कोण करू शकतो?
- MS-CIT कोर्से करण्यासाठी मला काँप्युटर चालवता येणे अनिवार्य आहे का?
- MSCIT कोर्से कुठून करावा?
- MSCIT कोर्सेचा कालावधी किती असतो?
- MSCIT कोर्से पूर्ण करण्यासाठी किती पैसे लागतात?
- MSCIT कोर्से करतांना काँप्युटर घेणे गरजेचे आहे का?
- MSCIT कोर्सेमध्ये मला काय शिकवले जाईल?
- MSCIT कोर्सेसाठी काही विकल्प आहे का?
- MSCIT कोर्स केल्यावर मला जॉब भेटू शकतो का?
- MSCIT कोर्स केलाच पाहिजे का?
- कॉम्पुटर शिकल्यावर मी काही धंदा करून पैसे कमाऊ शकतो का?
- कॉम्पुटरचा वापर करून पैसे कसे कमवायचे?
एम एस सी आय टी म्हणजे काय? एम एस सी आय टी चा फुल फॉर्म काय आहे?
एम एस सी आय टी चा फुल फॉर्म दि महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि हा आहे.
एम एस सी आय टी कोर्से हा काँप्युटर शिकण्यासाठी खूप जास्त पसंती दिलेला कोर्से आहे.
बरेच विद्यार्थी दहावी झाल्यावर मश्चित कोर्से करतात.
MSCIT कोर्से हा एक सर्टिफिकेट कोर्से आहे.
एम एस सी आय टी कोर्से कोण करू शकतो?
MSCIT हा कोर्से कोणीही करू शकते.
आठवीत असलेला विद्यार्थ्यांपासून ते पदवी झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत कोणीही एम एस सी आय टी हा कोर्से करू शकतो.
अन्य कोर्सेस सारखे ह्या कोर्सला काही अटी नाहीत कि तुमचा हेच बॅकग्राऊंड पाहिजे किंवा इतके शिक्षण झालेले पाहिजे.
MSCIT मुळातच तुम्हाला काँप्युटरचे मूलभूत गोष्टी (basics) शिकवतो.
त्यामुळे जे कोणी काँप्युटर शिकण्यासाठी इच्छुक असेल तो MSCIT हा कोर्से करू शकतो.
MS-CIT कोर्से करण्यासाठी मला काँप्युटर चालवता येणे अनिवार्य आहे का?
नाही.
MSCIT कोर्से करण्यासाठी तुम्हाला काँप्युटर चालवता येणे अनिवार्य नाही.
मुळातच ह्या कोर्से मध्ये तुम्हाला काँप्युटर कसे चालवायचे ते शिकवतात.
MSCIT कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला काँप्युटर चालू करण्यापासून ते काँप्युटर professionally कसे वापरायचे ते शिकवतात.
त्यामुळे जर तुम्हाला काँप्युटर चालवता येत नसेल तरीही तुम्ही MS-CIT हा कोर्से करू शकता.
MSCIT कोर्से कुठून करावा?
MSCIT कोर्से शक्यतो ऑफलाईन माध्यमाने MSCIT अप्प्रोव्हड सेन्टर्स मध्ये घेतला जातो.
जवळ जवळ सगळ्याच शहरांमध्ये आणि गावांमध्ये MSCIT अप्प्रोव्हड सेन्टर्स असतात.
तिथून तुम्हाला MSCIT कोर्से करता येतो.
एका शहरात किंवा एका गावात एका पेक्षा जास्त MS-CIT सेन्टर्स असू शकतात.
त्यामुळे तुम्हाला कोणत्या सेन्टर मध्ये MS-CIT कोर्से करायचा ते तुम्ही तुमच्या सोयी नुसार ठरवू शकता.
हे जाणून घेणे महत्वाचे आहे कि प्रत्येक सेन्टर मध्ये वेगळे वेगळे शिक्षित असतात.
वेगवेगळे शिक्षक म्हणजे शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्यामुळे तुम्ही तुमच्या आसपास ज्या लोकांनी MS-CIT कोर्से केलेला आहे त्यांच्याकडून हि माहिती घेऊ शकता कि कोणत्या सेन्टर मध्ये चांगले शिकवले जाते.
हे सुर्वेक्षण केल्यांनतर आपण कोणत्या सेन्टर मध्ये MSCIT कोर्से करायचा ते ठरवू शकता.
अश्या प्रकारे तुम्ही तुमचे MSCIT सेन्टर निवडू शकता जेणे करून तुम्हाला कंपातूरचे शिक्षण नीट घेता येईल.
MSCIT कोर्सेचा कालावधी किती असतो?
MSCIT हा ३ महिन्याचा कोर्से असतो.
३ महिने तुमचे रोज २ ते ३ तास क्लास घेतले जातात.
क्लास मध्ये तुमची थेअरी आणि प्रॅक्टिकल्स घेतले जातात.
कलाससाठी वेगवेगळ्या बॅच असतात.
तुम्ही चौकशी करायला गेल्यावर तुम्हाला कोणती बॅच घ्यायची आहे त्याचे पर्याय तुम्हाला दिले जातात.
तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमची बॅच निवडू शकता.
शक्यतो विद्यार्थी उन्हाळाच्या सुट्टीमध्ये MS-सिट कोर्सेचा क्लास लावतात.
जर तुम्ही उन्हाळ्यात MSCIT कोर्सेचा क्लास लावत असाल आणि जर सेन्टर तुमच्या घरापासून लांब असेल तर सकाळची किंवा संध्याकाळची बॅच घेणे जोग्या असेल जेणे करून तुम्ही उन्हाचा प्रवास टाळू शकतात.
MSCIT कोर्से पूर्ण करण्यासाठी किती पैसे लागतात?
MSCIT कोर्सची फी ४,५०० रुपये इतकी आहे.
जर तुम्ही एका हफ्त्यामध्ये फी भरली तर तुम्हाला ४,५०० रुपये फक्त लागतात पण जर तुम्ही २ हफ्त्यामध्ये फी भरणार असाल तुम्हचा पहिला हफ्ता २,३५० रुपये आणि दुसरा हफ्ता २,३५० रुपये, म्हणजेच पूर्ण ४,७०० रुपये फक्त इतका खर्च येतो.
MSCIT कोर्सेसाठी इतर काही खर्च येत नाही. तुम्ही जेवढी फी भारतात तीच तुमची एकमेव गुंतवणूक असते.
तुम्हाला याच फी मध्ये MSCIT कोर्सचा अभ्यास करण्यासाठी पुस्तक पण दिले जाते.
MSCIT कोर्से करतांना काँप्युटर घेणे गरजेचे आहे का?
नाही.
MSCIT कोर्से करतांना काँप्युटर घेतलेच पाहिजे असा काही नाही.
मुळातच तुम्ही जिथे क्लास लावणार आहेत तिथे सगळं काँप्युटरवरच शिकवतात.
क्लास मध्ये खूप कॉम्प्युटर्स असतात, तुमचा सुरवातीला थेअरी क्लास घेतला जातो आणि नन्तर तुम्हाला त्या कॉम्प्युटर्स वॉर प्रॅक्टिस करायला दिले जाते.
पण जर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही काँप्युटर घेऊ शकता. पण फक्त MSCIT कोर्से करताय आणि कोर्सेसाठी काँप्युटर लागणार आहे आणि घावेच लागेल म्हणून घेताय तर काँप्युटर घेऊ नका.
जर तुम्हाला काँप्युटरची गरज असेल तर काँप्युटर नक्की घ्या.
काँप्युटरचे फायदे खूप आहेत.
आजकाल काँप्युटरचा उपयोग सगळ्या ठिकाणी होतो.
MSCIT कोर्सेमध्ये मला काय शिकवले जाईल?
MSCIT कोर्सेमध्ये तुम्हाला काँप्युटर बद्दल भरपूर काही शिकवले जाते.
MSCIT कोर्सेच्या अभ्यासक्रमामध्ये खाली दिलेली धडे आहेत: (लक्षात ठेवा कि हि फक्त काही धडे आहेत, यापेक्षा जास्त शिकवले जाते MSCIT कोर्समध्ये.)
हे MS-CIT कोर्समध्ये शिकवले जाणारे काही महत्वाचे विषय आहेत.
MSCIT कोर्सेसाठी काही विकल्प आहे का?
हो.
MSCIT कोर्सेसाठी भरपूर विकल्प आहेत.
जर तुमचे उद्देश काँप्युटर शिकणे असेल तर ऑनलाइन खूप अश्या वेबसाइट्स आहेत ज्या तुम्हाला काँप्युटर बद्दल सर्व काही शिकवतात.
Udemy सारख्या संकेतस्थळावर तुम्हाला काँप्युटर शिकवले जाते आणि कोर्से पूर्ण झाल्यावर त्याचे सर्टिफिकेट पण दिले जाते.
जर तुमचा पारंपरिक शिक्षण पद्धतीवर जास्त विश्वास असेल किंवा तुम्हाला असेल वाटत असेल कि घर बसून तुम्ही काँप्युटर शिकू शकत नाही तर MSCIT कोर्सेचे कलासीस लावणे योग्य निर्णय आहे.
MSCIT कोर्स केल्यावर मला जॉब भेटू शकतो का?
MSCIT कोर्स हा तुम्हाला कॉम्पुटरचे बेसिक शिकवतो.
नुसता MSCIT कोर्से केलेला आहे म्हणून तुम्हाला कोणी जॉब देणार नाही.
MSCIT कोर्सचा उपयोग तुम्हाला जॉब interview च्या वेळेस होऊ शकतो.
तुम्ही तुमच्या resume मध्ये हे दाखवू शकता कि तुम्ही MSCIT कोर्से केलेला आहे आणि तुम्हाला कंप्युटर वापरता येते.
पण MSCIT कोर्सेचा दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला कंप्युटर कसे चालवावे ते कळते.
ते कळले कि तुम्ही तुमच्या स्किल्सचा वापर करून ऑनलाइन पैसे कमाऊ शकता.
आजकाल ऑनलाइन पैसे कमावणे खूप सोपे झालेले आहे.
MSCIT कोर्स केलाच पाहिजे का?
जर तुम्हाला जॉब करायचाय, तर तुम्हाला कॉम्पुटर बद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे कारण आजकाल सगळीकडेच कॉम्पुटरचा वापर केला जातो.
बऱ्याच वेळा असे होते की जॉब इंतेरवीदेव ला गेल्यावर तुम्हाला कॉम्पुटर वापरता येत नाही म्हणून रिजेक्ट केले जाते.
हे टाळण्यासाठी तुम्हाला कॉम्पुटर वापरता येणे गरजेचे आहे.
पण कॉम्पुटर वापरता यावे यासाठी MSCIT कोर्स केलाच पाहिजे असा काही नाही.
तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा कॉम्पुटर शिकू शकता.
जसे मी सांगितले, खूप संकेतस्थळांवर संगणक कसे वापरायचे याची माहिती दिली जाते.
असा पण आहे कि MSCIT केल्यामुळे तुम्हाला कॉम्पुटर वापरता येत याचा प्रूफ म्हणून तुम्ही MSCIT चे सर्टिफिकेट वापरू शकता.
पण ते सर्टिफिकेट तुम्हाला UDEMY ह्या वेबसाइट वरून कॉम्पुटर कोर्स केल्यावर सुद्धा मिळते.
विशेष म्हणजे, UDEMY वरून तुम्ही खूप स्वस्तात कोर्स करू शकतात आणि ते हि घरबसल्या.
पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि UDEMY ह्या संकेतस्थळावरून कोर्से केल्यावर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर त्याचे निवारण करण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा एखांद्यावेळेस निवारण होणार पण नाही.
पण जर तुम्ही MS-CIT क्लास लावत असाल आणि तुम्हाला काही अडचण आली तर क्लासचे शिक्षक तुम्हाला मदत करतात.
जर घरी अभ्यास करतांना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी क्लास ला गेल्यावर आपले प्रश्न विचारू शकता.
कॉम्पुटर शिकल्यावर मी काही धंदा करून पैसे कमाऊ शकतो का?
हो. कॉम्पुटर शिकल्यावर तुम्ही ऑनलाइन पैसे कमाऊ शकता.
अशे खूप लोक आहेत जे आज महिन्याचे १ लाखापेक्षा जास्त कमावतात.
कॉम्पुटरचा वापर करून पैसे कसे कमवायचे?
घरबसल्या पैसे कमावण्यासाठी काही पसंतीची कामे आहेत:
मला कॅम्पुटर शिकायचे
धन्यवाद आपल्या सखोल मार्गदर्शना बद्दल ते हि मराठी मनापासून आभार….
खूप छान माहिती दिल्या सर