Tally कोर्से करायचंय? मी ह्या पोस्टमध्ये तुम्हाला Tally बद्दल सर्व माहिती देणार आहे.
Tally चा फुल्ल फॉर्म काय आहे?
Tally: Transactions Allowed in a Linear Line Yards
Tally काय आहे?
Tally एक सॉफ्टवेअर आहे जे Business मध्ये गणिते किंवा ऑडिटिंगसाठी वापरतात. हे सोडून Tally चे खूप उपयॊग आहेत.
Tally मुळे ह्या हिशोबांसाठी आपल्या पारंपरिक पद्धतींपेक्षा खूप कमी वेळ लागतो. Tally वापरल्यामुळे खूप वेळ वाचतो.
Tally हे सॉफ्टवेअर कोणतेही Business वापरू शकतात.

तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि मार्गदर्शन असल्यास, तुम्ही देखील ऑनलाइन पैसे कमवू शकता!
Tally कोर्सेचा कालावधी किती आहे?
Tally कोर्से हा २ महिन्याचा असतो.
पहिल्या महिन्यात तुम्हाला Tally बद्दल बसूसास शिकवले जातात.
दुसऱ्या महिन्यात तुम्हाला GST, ऑडिटिंग सारख्या ऍडव्हान्स गोष्टी शिकवल्या जातात.
Tallyकोर्स पूर्ण केल्यानंतर, आपण Tally सॉफ्टवेयर योग्य प्रकारे वापरू शकता.
Tally कोर्से करायला किती पैसे लागतात?
जर तुम्ही Tally कोर्से ऑफलाईन पद्धतीने करत असाल तर तुमच्याकडून ३ हजार ते ७ हजार रुपये आकारले जाऊ शकता.
जर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने कोर्से करणार असाल तर तर हि फीस कमी किंवा जास्त असू शकते.
ऑनलाइन खूप अश्या वेबसाइट्स आहेत ज्या Tally चा कोर्से विकतात आणि तुम्हाला Tally सॉफ्टवेअर वापरणे शिकवतात.
पण जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर आपण ऑनलाइन कोर्से करण्याआधी खात्री करून घ्या कि कोर्से पूर्ण झ्हाल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल का ते.
टीप
Udemy सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ५०० रुपये ते १ हजार रुपयातही हा कोर्से करू शकतात.
Udemy तुम्हाला कोर्से पूर्ण केल्यावर कॉम्पलेशन सर्टिफिकेट पण देते. तुम्हाला फक्त कोर्सेच्या माहिती मध्ये पाहावा लागेल कि कोर्से पूर्ण झ्हाल्यावर तो सेलर सर्टिफिकेट प्रदान करतो का ते.
Tally कोर्सेसाठी मी पात्र आहे का?
तसे Tally कोर्से कोणीपण करू शकतो पण शक्यतो कॉमर्स फील्ड मधले लोक Tally कोर्से करतात.
जर तुम्ही पदवीनंतर Tally कोर्से करत आहेत तर हे गरजेचे आहे कि तुमचे एडुकेशनल बॅकग्राऊंड कॉमर्स मधले असावे.
Tally कोर्से केल्यावर मला जॉब भेटेल का?
ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही Tally कोर्से कधी करत आहेत त्यावर अवलंबून आहे.
जर तुम्ही पदवीच्या आधी Tally कोर्से करत आहेत तर तुम्हाला जॉब भेटणे अवघड आहे. मी असे नाही म्हणत कि तुम्हाला जॉब भेटणारच नाही, तुम्हाला जॉब भेटू शकतो पण ते कंपनीच्या धोरणावर अवलंबून असते. तुम्ही Tally कोर्से करून इंटर्नशिप करू शकता.
जर तुमची पदवी झालेली असेल तर तुम्हाला जॉब भेटणे शक्य आहे. पदवी झालेल्या व्यक्तींना कॉलेज मधून जॉब भेटू शकतो किंवा त्यांना तो स्वतः शोधावा लागतो.
Tally कोर्सेचे कलासेस प्लेसमेंट ड्राइव्हस घेतात का?
नाही, तुमचे कलासेस तुम्हाला प्लेस नाही करून देत.
तुम्ही जर कॉलेजचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला तुमचे कॉलेज जॉब सापडण्यात मदत करू शकते.
Tally कोर्से झालेल्या व्यक्तीला किती पगार भेटतो?
Tally कोर्से झ्हालेल्या व्यक्तीला सुमारे १ लाख ते ५ लाखापर्यंत वार्षिक पगार भेटू शकतो.
हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कि तुमचा पगार तुमच्या एडुकेशनल बॅकग्राऊंडवर व वर्क एक्सपेरियन्सवर अवलंबून असतो.
oMarathi.com
आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.
तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि मार्गदर्शन असल्यास, तुम्ही देखील ऑनलाइन पैसे कमवू शकता!