करिअर – करिअर कसे निवडावे, करिअर संधी, करिअर विषयी माहिती

करिअर म्हणजे काय?

करिअर म्हणजे तुम्ही जीवनात पुढे काय शिकता आणि काय काम करतात.

करिअर मार्गदर्शन तुम्हाला जीवनात जे काही करायचे आहे ते कसे करायचे त्याची वाट दाखवतो.

दहावीनंतर काय?

दहावीनंतर काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. दहावीनंतर तुम्ही कोणता विषय घेतात यावर तुमच्या करिअरची दिशा ठरते.

शक्यतो तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोर्ससाठी तुमच्या १०+२ नंतर प्रवेश घेतात.

हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि तुम्ही १० वी नंतर काय करतात त्यानुसार तुम्हाला १०+२ नंतर कोणत्या कोर्सला प्रवेश घ्यायचा आहे ते ठरवता येते.

जर तुम्ही आधीच तुमच्या करिअरचा मार्ग निश्चित केला असेल तर आपण साइटवरील कोर्सची यादी पहावी.

सर्व कोर्स १२वी नंतर काय करावे या पेज वर आहेत.

त्यात तुमच्या कोर्सवर क्लिक करा आणि त्या कोर्सची पात्रता पहा. पात्रता पाहिल्यावर तुम्हाला अंदाज येईल कि तुमच्या पसंतीच्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला दहावीनंतर काय करावे लागेल.

उदा.

दहावी नंतर तुमच्यासाठी भरपूर संधी उपलब्ध असतात. त्यातील काही आहेत:

  • Science
  • Commerce
  • Arts
  • Diploma (Polytechnic and Vocational)
  • I.T.I (Technical and Non-Technical)
  • Skill Training Programs

दहावीनंतर काय करावे याबद्दल तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी खालील पोस्टवर क्लिक करा.

बारावी नंतर काय?

बारावी नंतर काय करावे हे ठरवतांना खूप सावधान राहावे लागते.

तुम्ही १२वी नंतर तुमच्या स्ट्रीम मध्ये graduation करू शकता.

काही कोर्स तुम्हाला स्ट्रीम बदलण्याची संधी देतात.

उदा- BBA कोर्स कोणत्याही स्ट्रीमचे विद्यार्थी स्वीकारतो.

BBA कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही तुमची बारावी कोणत्या स्ट्रीममध्ये केली आहे याचा काही फरक पडत नाही.

काही कोर्सेससाठी हे गरजेचे आहे कि आपण आपली बारावी विशिष्ट विषयांसह विशिष्ट स्ट्रीममध्ये केलेली पाहिजे. ते सर्व प्रवाहामधील विद्यार्थ्यांना स्वीकारत नाहीत.

उदा – BE course करण्यासाठी तुम्ही तुमची बारावी सायन्स स्ट्रीम मधून करणे अनिवार्य आहे. BE हा कोर्से फक्त ससान्स स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांना करता येतो.

तुम्ही कोणत्या स्ट्रीम नंतर कोणते कोर्स करू शकता याची खाली दिली आहे.

आपल्याकडे बारावीनंतर खालील पर्याय आहेतः

  • Graduation
  • Skill Training Programs
  • Online Courses

बारावीनंतर काय करावे याबद्दल तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी खालील पोस्टवर क्लिक करा.

पदवी नंतर काय?

पदवी नंतर शक्यतो सगळ्या विद्यार्थ्यांची जॉब करावा अशी इच्छा असते.

पदवी पूर्ण झाल्यावर काही विद्यार्थी जॉब करतात तर काही विद्यार्थी पुढे शिकतात.

ज्या विद्यार्थ्यांना पदवी झाल्यावर जॉब भेटत नसेल ते विदयार्थी त्यांच्या क्षेत्रात पुढे पोस्ट-ग्रॅजुएशन करतात किंवा MBA करतात.

काही विद्यार्थी मुळातच पुढे शिकण्यासाठी इच्छुक असतात त्यामुळे ते जॉबच्या मागे लागत नाही.

तुम्ही पदवी झाल्यावर काही ऑनलाइन कोर्स करून तुमचे कौशल्ये देखील विकसित करू शकता.

पदवी नंतर उपलब्ध पर्यायः

ऑनलाइन कोर्स

खूप सारे ऑनलाइन कॉम्पुटर कोर्स आहेत किंवा स्किल-डेव्हलोपमेंट कोर्स आहेत जे तुम्ही करू शकता. काही कोर्से असे आहेत कि ते केल्यावर तुम्हाला जॉब देखील भेटू शकतो.

ऑनलाइन कोर्सची यादी: